dr.satish responsive layout developer

गावातील विविध सुविधा

शैक्षणिक सुविधा :

आमच्या गावामध्ये अगंणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक कॉलेज इत्यादी शैक्षणिक सोय आहे. गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे.गावामध्ये एकूण अंगणवाडया 6 आहेत. व त्यापुढीलही शिक्षण गावातच उपलब्ध आहे. त्यामुळे गावातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागत नाही. गावात मराठी तसेच इंग्लिश मिडियम शाळा आहेत. गावातील सर्व शाळेंचा निकाल हा दरवर्षी 100% लागतो.  

प्राथमिक शाळा - कुमार व कला विद्या मंदिर.

माध्यमिक शाळा – श्री. शिवाजी विद्यालय ,महात्मा फुले विद्यालय.

उच्च माध्यमिक – राजा शिवछत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालय.
संत गजानन पॅालीटेक्नीक कॉलेज.

जय भारत इंग्लिश मिडीयम स्कुल.

दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्ध उत्पादन हा व्यवसाय असून गावामध्ये पाच दुध संस्था आहेत.गावामध्‍ये कांही लोकांनी दुग्धव्यवसायासाठी आधुनिक गोठा पध्‍दत तंत्राचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्‍पन्नात वाढ झालेली आहे. तसेच गावातील लोकांचे राहणीमान सुधारले आहे.

दूध संस्था व त्यांची नावे -

 • महागाव सह. दुध व्याव. संस्था
 • आण्णासो पाटील सह. दुध संस्था 
 • यशवंत सह दुध व्याव. संस्था
 • महाकाली महीला सह. दुध. व्याव संस्था
 • सह्याद्री सह. दुध संस्था

आरोग्य सुविधा :

गावामध्‍ये आरोग्‍य सुविधा चांगल्‍या प्रकारे उपलब्‍ध आहेत. गावामध्‍ये शासनाचे एक प्राथमिक आरोग्‍य केंद्र असुन तेथे डॉक्‍टर, नर्स व मदतनीस कार्यरत आहेत. त्‍यामुळे गावातील गोरगरीबांचा औषधपाण्‍याचा प्रश्‍न सुटलेला आहे. तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्रामुळे गावातील तात्‍काळ आरोग्‍य सेवा उपलब्‍ध होते. गावामध्‍ये खाजगी दवाखाने देखील उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे गावातील लोकांना बाहेरगावी उपचारासाठी जावे लागत नाही.

 • जवळचे प्राथमिक रुग्णालयाचे नाव - प्रा. आ. केंद्र महागाव
 • गावातील खाजगी दवाखाने संख्या   - 8

महिला बचत गट :

महिलांचा आर्थिक व सामिजिक विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यामार्फत महिलांचे सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे. या बचत गटाच्या माध्यमातून महिला लघु उद्योग चालू करत आहेत.

महिला बचत गट व त्यांची नावे -

 • गणेश महिला बचत गट
 • महाकाली  महिला बचत गट
 • महात्मा फुले  महिला बचत गट
 • धनलक्ष्मी  महिला बचत गट
 • आण्णाभाऊ साठे  महिला बचत गट
 

तरूण मंडळे :

तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. वेगवेगळया प्रकारचे क्रिडा स्‍पर्धा तसेच सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्‍ताने वेगवेगळ्या स्‍तरावर यश प्राप्‍त केलेल्‍या मुला मुलींना प्रशस्‍तिपत्र देवून सन्‍मानित करणेत येते त्‍यामुळे त्‍यांना प्रेरणा प्राप्‍त होण्यास मदत होते.

तरूण मंडळ व त्यांची नावे -
 • आझाद चौक महागाव
 • ब्रम्हदेव मित्र मंडळ
 • यंगसर कला व क्रिडा मंडळ महागाव
 • नेताजी चौक महागाव
 • रनझुंजार कला क्रिडा मंडळ महागाव

वाचनालय :
गावा – गावांतील सार्वजनिक वाचनालयांचे महत्व समजून तसेच गावातील मुला – मुलीना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाची स्थापना केली आहे. वाचनालयामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी हवी असणारी पुस्तके, जनरल नॉलेजची पुस्तके व इतरही मटेरियल (साप्ताहिके,मासिके) उपलब्ध करून दिले जाते. गावातील वाचनालय हे सर्वांच्यासाठी खुले आहे. येथे मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते.  

वाचनालयाचे  नाव :

 • भगतसिंग वाचनालय

व्यायामशाळा :-
मुलांना शिक्षणाबरोबरच व्यायामाचीही सवय असावी यासाठी गावामध्ये व्यायाम शाळा काढली आहे.
व्यायामशाळाचे नाव :

 • स्वराज व्यायामशाळा महागाव.

वित्तिय संस्था

ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये श्री.महागाव विकास सेवा संस्था, महागाव. व श्री.बाबासाहेब कुपेकर विकास सेवा संस्था, महागाव. यांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्था मार्फत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते. त्याचबरोबर गावात बँकेच्या सोई सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे गावातील तसेच आजुबाजुच्या लोकांना या बँकांचा उपयोग होतो आहे.

 

:

ADDRESS
Mahagaon Grampanchayat
A/p Mahagaon Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone : 9665305958
Office : 02327 - 275217