dr.satish drag and drop website developer

आमचं गाव :

महागांव हे गडहिंग्‍लज तालुक्‍यातील सर्वात मोठे गाव म्‍हणून ओळखले जाते. गडहिंग्‍लज तालुकयामघ्ये सर्वात जास्‍त लोकसंख्‍या असणारे गाव आहे, आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 1459 असून गावाची लोकसंख्या 7020 इतकी आहे. तर एकूण घरांची संख्या 2705 असून ती 5 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहेत. पंचक्रोशीत प्रसिद्ध  असा आठवडी बाजार हा आठवडयाच्‍या दर सोमवारी आसतो. या बाजारासाठी जवळपास २०० ते ३०० लहान मोठे व्‍यापारी येत असतात‚ तसेच शेळी, मेंढी यांचा बाजार भरत असतो त्‍याच बरोबर महागांवमध्‍ये कायमस्‍वरुपी कापड दुकाने‚ किराणा दुकाने, हॉटेल‚ पान शॅाप‚ स्‍टेशनरी‚ मटण, चिकण मार्केट‚ जेन्ट्स लेडिज टेलर‚ इलेक्‍ट्रीकल्‍स वस्‍तू विक्री व दुरूस्‍ती दुकाने‚ दुध विक्री केंद्र‚ तसेच बॅंका‚ सेवा सेासायटया आशा अनेक संस्‍था असून त्‍यामुळे महागांवला वैभव प्राप्‍त झाले आहे.

कृषी आणि गाव :

आमच्या गावातील प्रमुख व्‍यवसाय शेती हा असून, येथे बागायत तसेच जिरायती पाण्‍याच्‍या पावसावर अवलंबून असणारी शेती केली जाते. गावातील कांही लोकांनी हिरण्‍यकेशी नदीचे पाणी आणले आहे. ज्‍याचा वापर शेतीसाठी केला जातो. गावातील बागायती कृषी क्षेत्र हे139.81 हेक्टर इतके असून जिरायती कृषी क्षेत्र1057.05 हेक्टर इतके आहे.  प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन यांचे उत्पादन घेतले जाते.गावामध्‍ये पारंपारिक तसेच आधुनिक पध्‍दतीचा अवलंब करून शेती केली जाते. गावामध्‍ये मोठे तसेच लहान शेतकरी आहेत. गावातील लोक शेतीला जोडधंदा म्‍हणून दुग्‍धव्‍यवसाय देखील करतात. गावामध्‍ये कांही लोकांनी दुग्धव्यवसायासाठी आधुनिक गोठा पध्‍दत तंत्राचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्‍पन्नात वाढ झालेली आहे. तसेच गावातील लोकांचे राहणीमान सुधारले आहे.

गावातील मंदिरे :

महागांव हे महकाली देवीची पुर्णाकृती मुर्ती असणारे पश्चिम महाराष्‍ट्रातले एकमेव मंदीर आहे. त्‍याचप्रमाणे महाकाली हे आमच्या गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्‍थान आहे. गावात महाकाली व लक्ष्‍मीची यात्रा ही सात वर्षातून एकदा होत असते. ही यात्रा खूप मोठ्याने व मोठ्या उत्साहाने केली जाते. तसेच गावाच्या मध्यभागी परशुराम तलाव आहे. या तलावामध्‍ये सुंदर असे सिध्दीविनायकाचे मंदीर उभारले आहे. तलावामध्ये मध्यभागी हे मंदिर उभारले असल्याने मंदिर खूप आकर्षक दिसते. हे मंदिर भाविकासाठी पर्वणी ठरले आहे. संकष्‍टी दिवशी तसेच गणेश जयंतीला येथे भाविकांची गर्दी असते. गणेश जयंतीला व अंगारकी संकष्‍टीला येथे महाप्रसाद असतो.

ADDRESS
Mahagaon Grampanchayat
A/p Mahagaon Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone : 9665305958
Office : 02327 - 275217